Heart Attack Saam tv
महाराष्ट्र

चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका; प्रवाशाचा मृत्यू

चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका; प्रवाशाचा मृत्यू

दिनू गावित

नंदुरबार : सुरतहुन प्रवाशांना घेऊन निघालेल्या सुरत– जामनेर चालत्या बसमध्ये नवापूर ते विसरवाडी दरम्यान एका 57 वर्षीय प्रवाश्याला अस्वस्थ वाटू लागले. चालक वाहक व सहप्रवाशांनी राष्ट्रीय महामार्गावर जवळील विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात (Hospital) सदर व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर व्यक्तीला नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले; दरम्यान विसरवाडीहुन नंदुरबार (nandurbar) येथे उपचारासाठी घेऊन जातांना रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. (nandurbar news Heart attack in a running bus Death of a passenger)

रोहिदास श्यामराव पाटील असे या व्यक्तीचे नाव असून सुरत (Surat) महानगरपालिका अग्निशमन दलात फायरमन पदावर काम करत असल्याचे ओळखपत्रामुळे माहिती मिळाली आहे. ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नातेवाईकांकडे वर्षश्राद्ध असल्याने जात असताना त्यांना बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. रोहीदास पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांना मोबाईलद्वारे कळविण्यात आले आहे.

ते खाली कोसळले

सुरत जामनेर (Jamner) चालत्या एसटी बसमध्ये नवापूर ते विसरवाडी दरम्यान सदर व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले. यात ते खाली पडल्यानंतर सहप्रवाशांनी चालक-वाहकला सांगून सदर प्रवाशाची स्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर चालक वाहकाने लगेच बस थांबवून उपचारासाठी दाखल केले. मात्र सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन जात असताना रस्त्यात दगावल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून कळविण्यात आले आहे. सदर व्यक्तीला प्रवासादरम्यान चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Liver disease: एड्सपेक्षाही धोकादायक आहे 'हा'लिव्हरचा आजार; 'साइलेंट किलर' समस्येची लक्षणंही वेळीच जाणून घ्या

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT