पोस्ट कार्ड
पोस्ट कार्ड 
महाराष्ट्र

लुप्त होणाऱ्या पोस्ट कार्डवर विद्यार्थ्यांनी काढले नववर्षाच्या शुभेच्छा चित्र

दिनू गावित

नंदुरबार : मोबाईलवरील एसएमएस व्हाट्सअपच्‍या युगात पोस्ट कार्डद्वारे कोरोना योद्धाना संदेश देण्याचा कलाशिक्षकांनी अनोखा उपक्रम राबविला. पोस्‍ट कार्डावर शुभेच्‍छा संदेश व चित्र काढून नातेवाईकांना पाठविले. (nandurbar-news-Happy-New-Year-drawings-by-students-on-postcards)

पोस्टकार्ड (Post Card) सध्या दुर्लक्षीत होत जात आहे. आताच्या पिढीला पोस्टकार्ड, पोस्ट ऑफिस, पत्र लेखन, पोस्ट कार्डवर संदेश कसा दिला जातो, पोस्ट ऑफिस विषयी आवड निर्माण व्हावी; यासाठी सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे कलाशिक्षक यांनी उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी त्या पोस्ट कार्डवर विविध चित्र काढून शुभेच्छा पत्र लिहून नातेवाईक, शिक्षक, संचालक मंडळ, शिक्षण विभाग, अधिकारी, पत्रकार आदींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पोस्ट कार्डवर विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे.

पोस्टकार्ड, पोस्ट ऑफिस, पत्रलेखन, संदेश, पोस्ट कार्डद्वारे शुभेच्छा आत्ताच्या पिढीला पोस्ट ऑफिसचे कार्य कसे चालते; या विषयी माहिती व्हावी व पोस्टकार्डवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोरोना योद्धा (Corona Yodha), नातेवाईक, शिक्षक, मित्र परिवार यांना देता यावे यासाठी प्रकाशा (Prakasha) येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे प्राचार्य एस.पी. पाटील, उपमुख्याध्यापक डी.टी.चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक नरेंद्र गोरख गुरव यांनी पोस्टकार्ड वर विविध चित्र काढून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा एक नवीन उपक्रम राबवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT