Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री शिरला अज्ञात व्यक्ती; रूममध्ये जात केला धक्कादायक प्रकार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Nandurbar News : गृहपालांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेची गंभीर दखल घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात मध्यरात्री एक अज्ञात व्यक्ती शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे ४० ते ४५ वर्षे वयाचा हा इसम रात्री मुलींच्या खोलीत शिरला. यानंतर झोपेत असलेल्या मुलीच्या पायावर जाऊन बसला होता. या धक्कादायक प्रकारामुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेची मोठी जबाबदारी असते. रात्रीच्या वेळी मुली बाहेर जाऊ नये; किंवा बाहेरील कोणी व्यक्ती वसतिगृहात प्रवेश करू नये यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. यासाठी वसतिगृहात वॉर्डन देखील नेमलेले असतात. दरम्यान नंदुरबार शहरात असलेल्या आदिवासी मुलीच्या वसतिगृहात मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  

मुलीचे तोंड दाबण्याचा प्रयत्न 
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सदर इसम वसतिगृहात शिरला. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता. तो थेट एका मुलीच्या खोलीत गेला. मुलगी जागी होऊन ओरडू लागल्यावर त्याने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला आणि 'मी वरून आलो आहे,' असे सांगू लागला. मुलीच्या आरडाओरडीमुळे इतर मुली जागा झाल्या. त्यांनी मदतीसाठी धाव घेतल्यावर तो व्यक्ती तिथून पळून गेला. या घटनेमुळे वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे.

पोलिसात तक्रार दाखल 
मात्र हा इसम वसतिगृहात कसा शिरला? त्याला वसतिगृहाची माहिती कोणी दिली होती का? त्याचा उद्देश काय होता? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गृहपालांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेची गंभीर दखल घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांना या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणे आणि त्याला पकडणे, हे मोठे आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू

Infertility Issue: जास्त तणावामुळे वंध्यत्वाची समस्या होते का?

Bhadgaon News : भडगाव शहर स्फोटाने हादरले; हॉटेलमधील भीषण स्फोटात १० जण जखमी

Viral News : देने वाला जब भी देता...! तासभर पडला पैशांचा पाऊस, लोकांची उडाली झुंबड; अनेकांनी नोटा टाकल्या खिशात

Nana Patekar : माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... Ind Vs Pak सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध, VIDEO

SCROLL FOR NEXT