Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : साधूच्या वेशात येऊन हातचालाखीने फसवणूक; टोळीला नंदुरबार पोलिसांनी केली अटक

साधूच्या वेशात येऊन हातचालाखीने फसवणूक; टोळीला नंदुरबार पोलिसांनी केली अटक

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात हातचालाखी करून सोने चोरीच्या घटनांमध्ये (Nandurbar) वाढ झाली होती. ज्येष्ठ नागरिकांना हेरून ही गॅंग सोन्याच्या वस्तू आणि पैसे लंपास करत होते. साधूच्‍या वेश परिधान करून ही टोळी सक्रीय झाली होती. या टोळीला नंदुरबार पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Maharashtra News)

ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहर आणि परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि शहर पोलीस स्टेशन यांना या घटकांना आडा घालण्यासाठीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने संशितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तिघांना (Nandurbar Police) अटक केली आहे. त्यांच्याकडून एक चार चाकी वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

रुद्राक्ष विकण्याचा व्यवसाय

साधूच्या वेशात फिरून रुद्राक्ष विकण्याचा व्यवसाय करत असल्याचं समोर आला आहे. साधूच्या वेशात असलेल्या गॅंगच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. साधूच्या वेशात फसवणूक करणाऱ्या गँगने शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलीस पथकाकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT