नंदुरबार : भारत स्वातंत्र्याच्या लढ्यात १९४३ साली अंग्रेज चले जाव चळवळ सुरू असताना मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज लढ्यात सहभागी होण्यासाठी येत असताना 1 मार्च 1943 रोजी त्यांनी रावलापाणी येथील निजरा नदीवर मुक्काम केला. याबाबत इंग्रज सैनिकांना कळताच 2 मार्च 1943 साली इंग्रज सैनिकांकडून अमानुषपणे बेछूट गोळीबार (Firing) करून लढ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना ठार करण्यात आल्याची इतिहासातील पुस्तकांमध्ये काही ठिकाणी नोंद आहेत. तरी या ठिकाणी इंग्रज सैनिकांच्या बंदूकीतून निघालेल्या गोळ्यांचे घाव आजही दगडांवर जिवंत आहे. (nandurbar news Forget about those who were martyred in the indiscriminate firing of the British)
सध्या स्थितीत हा परिसर (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (Taloda) तालुक्यातील रावलापाणी, रंजनपुर या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शहिदांची आठवण म्हणून स्मारक उभारावे, या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा. अशी मागणी येथील नागरिकांची होती. या मागणीला अनुसरून 2018 साली पर्यटन विभागाने विकासासाठी पुढाकार घेतला. दोन कोटी 57 लाख निधीची तरतूद करण्यात आली. कामालाही सुरुवात झाली परंतु पायाभरणी नंतर काम ठप्प झाले आहे.
टोलवाटोलवीची उत्तरे
रावलापाणी येथील स्मारकाच्या कामाचे शासन स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी स्मारकासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याची चर्चाही आहे. तसेच सदर बांधकामाचा निधी पर्यटन नियोजन विभागाकडे तपास केला असता त्यांनी आदिवासी विकास विभाग करत असल्याची माहिती दिली. तर आदिवासी विकास विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी फक्त रस्त्याच्या कामाचा निधी दिल्याची माहिती दिली. स्मारकाचा निधी पर्यटन विभागाकडून असेल अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली गेली आहे. त्यामुळे उर्वरित काम कधी पूर्ण होईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर नागरिकांनी काम पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
रावलापाणी येथील शहीद स्मारकाचा निधी राजकीय श्रेयासाठी थांबवला आहे की मग शासनाकडे निधी नाही किंवा अन्य काही कारण आहे हा संशोधनाचा विषय आहे. तरी येथील नागरिकांनी मात्र काम न झाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी रावलापाणी निजरा नदीवरील शहीद भूमीवर समाज बांधवांच्या वतीने शहिदांची आठवण करून अभिवादन केले जाते. यावर्षीही या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून शहिदांना अभिवादन केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.