Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यात ८ लाखाचे विदेशी मद्य जप्त

नंदूरबार जिल्ह्यात ८ लाखाचे विदेशी मद्य जप्त

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा अवैध विदेशी मद्य वाहतूक करतांना तळोदा (Taloda) आमलाड रस्त्यावर पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. यात वाहन व मद्य असा १५ लाख ७७ हजार ५२८ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई तळोदा पोलिसांनी केली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्‍ह्यालगत असलेल्‍या मध्‍यप्रदेश व गुजरात राज्‍याच्‍या सिमेलगत भागातून मद्याची मोठी अवैध वाहतूक केली जात असते. अनेकदा कारवाई होवून देखील छुप्‍या पद्धतीने ही वाहतूक केली जाते. अशाच प्रकारे तळोदा पोलिसांना अवैध मद्याची वाहतूक वाहनातून होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.

मद्याचे २०७ खोके जप्‍त

त्‍यानुसार ट्रकमधून विदेशी मद्याचे २०७ खोके सुमारे ७ लाख ७७ हजार ५२८ रुपयांचे विदेशी मद्य व ८ लाखाचे वाहन असा एकूण १५ लाख ७७ हजार ५२८ रु मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचा पथकाने केली. चालक वाहन सोडून फरार झाला असून तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mahapalika Bharti: पुणे महापालिकेत नोकरीची संधी; १६९ पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Dandruff Free Hair: केसातील कोंडा आणि खाज कमी करण्यासाठी वापरा 'हे' तेल, वाचा सोपे उपाय

Maharashtra Live News Update: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला पाहण्यासाठी शिवाजी पार्कात चाहत्यांची गर्दी

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

SCROLL FOR NEXT