Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

पाण्यावर तरंगणारा तांदूळ प्लास्टिक नव्हे; तर अनेक आजारांवर उपयुक्त पौष्टिक फोर्टीफाईड तांदूळ

दिनू गावित

नंदुरबार : अंगणवाडी व शालेय पोषण आहार मध्ये दिले जाणारे फोर्टीफाईड तांदूळ आता रेशन दुकानातून मिळणाऱ्या तांदळामध्ये 100 तांदळाच्या मागे एक फोर्टीफाईड तांदूळ (Rice) असे मिक्स पद्धतीने वाटप केले जात आहे. मात्र सदर तांदुळावर प्रक्रिया केलेली असल्याने पाण्यावर तरंगतो तसेच शिजवतानाही इतर तांदळांपेक्षा पाण्यापासून वेगळा होतो. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये सदर तांदूळ प्लास्टिकचा असल्याची शंका निर्माण झाल्याने शिजवताना पाण्यातून बाहेर काढून टाकला जात आहे. नागरिकांमधील ही शंका दूर व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यशाळेचे (Nandurbar) आयोजन करण्यात आले होते. (Nandurbar Today News)

इतर तांदळापेक्षा वेगळा दिसणारा तांदूळ फर्टीफाईड आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, अ‌ॅनिमिया या आजारांसाठी उपयुक्त असल्याने शंभर तांदळा मागे एक असे मिक्स करून शासनातर्फे दिले जात आहे. त्यामुळे फोर्टीफाईड तांदळाविषयी जनसामान्यांना उद्भवलेल्या शंका दूर व्हाव्या या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे. कार्यशाळेत तज्ञ व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात सिकलसेल, अ‌ॅनिमियाचे रुग्ण असल्याने रक्तामधील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हे तांदूळ पौष्टिक असून या तांदळाचा वापर कसा करावा? याबद्दल स्थानिक भाषेत जनजागृती करून फोर्टीफाईड तांदळाचे महत्त्व सांगावे असे सांगितले. यावेळी अविक भट्टाचार्य, सलीम दिवाण, नीलेश गंगावरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रसंगी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, खाद्य निगमचे उपमहाप्रबंधक अर्धदिपराय, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. एल. बावा, केंद्रीय अन्न मंत्रालयाचे अविक भट्टाचार्य, सलीम दिवाण, नीलेश गंगावरे यांच्या सह जिल्ह्यातील रेशन दुकानदार व काही सरपंच व सदस्य उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

SCROLL FOR NEXT