महाराष्ट्र

उमराणी गावात रात्री वन्यप्राण्यांकडून पाच बकऱ्या केल्‍या ठार

उमराणी गावात रात्री वन्यप्राण्यांकडून पाच बकऱ्या केल्‍या ठार

दिनू गावित

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील उमराणी बुद्रुक देवपाडा येथे रात्रीच्या वेळी फोपऱ्या ठोबा पावरा यांच्या घरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या ठार केल्या आहे. यामुळे शेतकरीचे मोठे नुकसान झाले आहे. (Nandurbar-news-Five-goats-were-killed-by-wild-animals-at-night-in-Umrani-village)

उमराणी गावातील पावरा यांनी घरालगत असणाऱ्या गोठ्यात बकऱ्या बांधलेल्‍या होत्‍या. गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांना रात्रीच्या वेळेस बिबट्या गोठ्यात घुसून एका मागून एक हल्ला करत पाचही बकऱ्यांना ठार मारल्याची घटना घडली. या बकऱ्यांचे काही अवशेष गोठ्यात, काही शेतात तर काही नाल्यात सापडले. घटनेची माहिती वनविभाग धडगाव येथे देण्यात आली असून वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

बिबट्याचा बंदोबस्‍ताची मागणी

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून हा बिबट्या गावात वावरतांना दिसून येत आहे. या घटनेमुळे बकरी पालन करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने सापळा रचून या बिबट्याला जेरबंद करावे; अशी मागणी गावकरी करत आहे. सदर घटनेत नुकसान झालेल्या शेळीपालन शेतकऱ्यांला शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT