महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर येथे प्रथमच फडकला तिरंगा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर येथे प्रथमच फडकला तिरंगा

साम टिव्ही ब्युरो

शनिमांडळ (नंदुरबार) : तालुक्यातील आसाणेपासून तीन किमी अंतरावर जंगलात मेंढ्या चारणारा समाज हा ठेलारी समाज म्हणून ओळखला जातो. या भागात स्‍वातंत्र्यानंतर प्रथमच ध्‍वजारोहणचा कार्यक्रम झाला. (nandurbar-news-first-time-after-75-years-of-independence-the-tricolor-was-hoisted-here)

ठेलारी समाज ज्या भागात चारा असेल; त्या भागात स्थलांतर करत असतो. परंतु आसाणे येथे मूळ ठिकाण असलेल्या ठेलारपाडा वस्ती ठिकाणी शेती व घर स्थायिक केले आहेत. पण तरीही सहा महिने पावसाळ्याचे येथे शेती व चाऱ्यासाठी राहतात अन्‌ सहा महिने उन्हाळ्याचे जिकडे पाणी व हिरवा चारा उपलब्ध होईल तिकडे स्थलांतर करतात. नेमकी हीच गोष्ट आसाणे येथील भारत पाटील, रवींद्र कांचन पाटील, सावळीराम ठेलारी, सखाराम ठेलारी, मंगा ठेलारी, अरुण पाटील, समाधान पाटील, आत्माराम पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी हेरली व वर शासन दरबारी तत्कालीन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल व खासदार हिना गावित व आमदार विजयकुमार गावित यांना पाठपुरावा करून जिल्हा परिषद मार्फत ठेलारपाडा वस्तीवर प्राथमिक शाळा मजूर करून हक्काची शाळा मिळवून दिली.

ठेलारी ज्‍येष्‍ठ नागरीकाच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

कधी काळी शालेय शिक्षणापासून वंचित असणारा मेंढपाळ समाज, जागा मिळेल तेथे चूल मांडणाऱ्या समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. तेथील समाजाला हक्काचा स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा मिळाला. याप्रसंगी थेतील ज्येष्ठ नागरिक घमा ठेलारी यांना झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला. प्रथमच झालेल्‍या या कार्यक्रमामुळे नागरीकांमध्‍ये देखील उत्‍साह होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT