Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारमध्ये मध्यरात्री हॉटेलला भीषण आग; ४ ते ५ लाखांचे नुकसान

Nandurbar News :सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेलला आग लागली होती. रात्रीच्या सुमारास सर्व काम आटोपून हॉटेल बंद करून घरी गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलला अचानक आग लागली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या मिशन शाळेच्या प्रवेशद्वारावरील एका हॉटेलला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण (Fire) आग लागल्याची घटना घडली. या आगीत (Nandurbar) हॉटेलमधील साहित्य जाळून खाक झाल्याने हॉटेल चालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.  (Maharashtra News)

नंदुरबार शहरातील नेहमी गजबज असलेल्या सिंधी कॉलनी परिसरातील हॉटेलला आग लागली होती. रात्रीच्या सुमारास सर्व काम आटोपून हॉटेल बंद करून घरी गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलला अचानक आग लागली. या लागलेल्या भीषण आगीत हॉटेलमधील पाच ते सहा फ्रिज, खाण्याचे साहित्य, टेबल खुर्च्या यांच्यासह स्वयंपाक तयार करण्याचे भांडी आदी साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे दिसून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीचे कारण अस्पष्ट 

हॉटेल मालक यांच्या म्हणण्यानुसार आगीत हॉटेलमधील मालासह चार ते पाच लक्ष रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र सदरची आग ही कशामुळे लागली, हे अद्यापही निष्पन्न झाले नसून या सर्व घटनेच्या तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT