Nandurbar RTO
Nandurbar RTO Saam tv
महाराष्ट्र

८३ वाहनांची बनावट नोंदणी; शासनाच्‍या ६६ लाख ६० हजार महसूलला चुना

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची तांत्रिक यंत्रणा हॅक करीत या कार्यालयामार्फत ८३ विविध प्रकारच्या वाहनांची बनावट नोंदणी करून ६६ लाख ६० हजाराचा महसुलला भामट्यांनी चुना लावला आहे. नागपूर (Nagpur) प्रादेशिक परिवहन कार्यालयात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एक वाहन ट्रान्स्फर करण्यासाठी गेले असता तेथील लिपिक यांना त्या वाहनाच्या आरसी बुकबाबत शंका आल्याने त्यांनी त्या वाहनाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे चौकशी केली असता ते वाहन क्रमांक निवडक/ आकर्षक (व्हीआयपी) श्रेणीतले असल्याचे आढळून आले. तसेच त्या क्रमांकावर कोणतेही वाहन क्रमांकाचे रजिस्ट्रेशन झालेले नसल्याचे दिसून आले. (nandurbar news Fake registration of 83 vehicles in rto)

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Nandurbar RTO) सर्व अभिलेख संबंधित लिपिक श्री. बागूल यांनी तपासले असता कोणीतरी बनावट आरसी बुक बनविल्याचे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिल्लक असलेले निवडक / आकर्षक क्रमांकाचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हस्तलिखित अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक/आकर्षक वाहन क्रमांकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली. सदर वाहन पोर्टलवरील बॅकलॉग साइटवर पाहणी केली असता ते वाहन क्रमांक रजिस्ट्रेशन असल्याचे दिसून आले. त्यामुळे लिपिक श्री. बागूल यांनी तत्काळ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांना माहिती दिली. श्री. बीडकर यांनी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेत माहिती दिली.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. श्री. कळमकर यांनी चौकशी केली असता हस्तलिखित अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक/आकर्षक वाहन क्रमांक हे इतर वाहनांना वापरून तसेच शासनाला कोणताही टॅक्स न भरता ते वाहन रजिस्टर केल्याचे दाखविले. तसेच विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ वाहनांच्या इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन शिवाय बनावट आरसी बुक तयार करुन शासनाची अंदाजित ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयाची फसवणूक केली. ८३ वाहन धारक, एजंट, तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल ,असा विश्‍वास जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नाराजी नाट्यावर पडदा! रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांमध्ये पुन्हा मनोमिलन; एकत्रित प्रचार करणार?

Happy Life: जीवनातला आनंद हरवलाय? मग या टिप्स फॉलो करा

Weightloss Tips: वजन कमी करण्यासाठी रात्रीचा डिनर बंद केलाय? शरीरासाठी ठरेल धोकादायक

Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

SCROLL FOR NEXT