Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: आठशे वर्षाची परंपरा; अक्कलकुवात रंगली घोड्यांची शर्यत

आठशे वर्षाची परंपरा; अक्कलकुवात रंगली घोड्यांची शर्यत

दिनू गावित

नंदुरबार : दसरा उत्सवानिमित्त पुजारी बाबांद्वारे नवाय खांब येथे पूजा व घोड्यांची पूजा करून राजघराण्यातील अठरावी पिढीतील सदस्य पृथ्वीसिंग दादा पाडवी यांच्या उपस्थितीत राजगादीच्या (Nandurbar) पूजनानंतर घोड्यांच्या शर्यतीचा नारळ फुटल्यानंतर शर्यतीला सुरुवात झाली. (Nandurbar News Dasara Utsav)

सातपुड्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील काठी संस्थांनच्या राज घराण्याकडून १२४६ सालापासून दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा ८०० वर्षानंतर आजही काठी संस्थान राजघराणे व नागरिकांद्वारे सुरू आहे. सातपुडा (Satpuda) पर्वतरांगांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने राजा महाराजांच्या काळात घोड्याला मोठे महत्त्व होते. दसरा (Dussehra) सणानिमित्त घोड्याचे पूजन करण्याची मोठी परंपरा होती. विशेष म्हणजे घोड्याची पूजा झाल्यानंतर घोड्यांची शर्यत लावली जाते. आजही ही परंपरा टिकून आहे. काठी संस्थानातील नवाय खांब पूजन झाल्यानंतर राजघराण्यातील राजांच्या राजगादीची पूजा केली जाते. त्यानंतर घोड्यांच्या शर्यतीची रेस लावली जाते.

८८ घोडेस्‍वारांचा सहभाग

घोड्यांच्या शर्यतीमध्ये यंदा गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास ८८ घोडेस्वारांनी सहभाग नोंदवला होता. काठी संस्थांनचा दसरा पूजन व घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी सातपुड्यासह गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते. सलग दुसऱ्या दिवशी घोड्यांची शर्यत पार पडल्यानंतर गरबा नृत्य कलाकार व विजेत्या घोडेस्वारांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील फोर्ट परिसरात ‘Bombay’ नामफलकावरून मनसेचा आक्षेप; दुकानाच्या पाटीवर मारली पट्टी

Bollywood News : मलायका अरोरानंतर अर्जुन कपूर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात ; PHOTO होतोय व्हायरल, नेमकी आहे तरी कोण?

Paneer Roll Frankie Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा चटपटीत आणि चमचमीत पनीर रोल फ्रँकी, वाचा रेसिपी

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ, १० तोळा २६,१०० रुपयांनी वाढले; १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

PM Narendra Modi: 15 डिसेंबरपूर्वी परदेश दौरे टाळा; PM मोदींनी मंत्र्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT