Dhadgaon Rain Saam tv
महाराष्ट्र

Dhadgaon Rain : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर धडगाव शहरात पुन्हा पाऊस; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. मागील आठवड्यात नावापुरमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात अजूनही अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. मागील आठवड्यात पाऊस झाला होता. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे पिकांना देखील संजीवनी मिळणार आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. मागील आठवड्यात नवापुरमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. दरम्यान राज्यातील अनेक भागात मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. (Rain) पावसाची संततधार सुरु असल्याने शेतकऱ्याला शेती काम करण्याची देखील संधी मिळत नाही. शिवाय पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या उलट चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. 

धडगाव शहरात पाऊस 

नंदुरबार जिल्ह्यात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र मागील आठड्यानंतर झालेल्या पावसानंतर आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर धडगाव शहरात आज दुपारच्या सुमारास पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात झाली. या पावसामुळे शेती पिकांना चांगला फायदा होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT