Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: ४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्‍याच वर्षी ओवर फ्लो

४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्‍याच वर्षी ओवर फ्लो

दिनू गावित

नंदूरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील देहली नदीवरील देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे. देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस (Rain) झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 197.70 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सूरवात झाली आहे. (Nandurbar News Today)

एकंदरीतच मागील गेल्या 40 वर्षापासून (Nandurbar News) रखडलेले काम यंदा पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील बहुचर्चित असा देहली मध्यम प्रकल्प प्रथम वर्षी पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्पात 19.08 दल लक्ष घन मिटर इतका जलसाठा उपलब्ध झाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी (Farmer) व परिसरातील लगतच्या गावांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याने प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरीकांना प्रशासनाचे आवाहन

देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्‍याने परिसराततील ग्रामस्थांनी व नागरिकांनी अंबाबरी येथील देहली मध्यम प्रकल्पातून होणाऱ्या सांडव्याचे मनमोहक दृश्य बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु, देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. असे आवाहन नंदूरबार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: वडाळ्यामध्ये नियोजनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल, ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना बुथ वाटप नाही

Maharashtra Assembly Election : मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे उमेदवारांसाठी निर्बंध; केवळ वापरता येणार तीन वाहने

Tulsi kadha Recipe: हिवाळ्याच्या दिवसात सर्दी ते खोकल्यापासून होईल सुटका; घरच्या घरी बनवा तुळशीचा काढा

IND vs AUS: पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?

Garlic Water Benefits: लसणाचे पाणी ठरेल केस गळतीवर रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT