Navapur News Saam tv
महाराष्ट्र

Navapur News : दमदार पावसानंतर नवापूर तालुक्यातील धरण, बंधारे ओव्हरफ्लो; पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात अजूनपर्यंत अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमीच आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : गेल्या आठवड्याभरात नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. दमदार पावसामुळे सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे तालुक्यातील नदी, नाले प्रवाहित झाले असून तालुक्यात असलेले लहान मोठे धरण आणि बंधारे देखील ओव्हर फ्लो झाले आहेत.  त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची समस्या आता मिटली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अजूनपर्यंत अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमीच आहे. मात्र गेल्या आठवड्यात नवापूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली होती. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक भागात पूरजन्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे नुकसान झाले. मात्र दुसरीकडे नाले, बंधारे व नदीला देखील पूर आल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बंधारे व धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. 

रंगवली धरण १०० टक्के भरले 

नवापूर (Navapur) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवापूर शहराला पाणी पुरवठा करणारे रंगावली धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे नवापूर शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. असे असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भाग अद्याप कोरडा असल्याने जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानंतर सर्व धरण व बंधारे पाण्याने फुल्ल भरतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT