Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारला वादळी तडाखा; नर्मदा काठावरील शाळेचे उडाले पत्रे, घरांचीही पडझड 

Nandurbar News : अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील मानिबेली आणि थुवणी गावात नर्मदा नवनिर्माण अभियान यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या जीवन शाळेतील वादळी वाऱ्यांमुळे शाळेचे पत्रे उडाले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. या दम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून जोरदार वाऱ्यामुळे नर्मदा काठावर असलेल्या शाळेचे पत्र उडाले आहेत. यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सातपुड्यातील (Satpuda) अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील मानिबेली आणि थुवणी गावात नर्मदा नवनिर्माण अभियान यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या जीवन शाळेतील वादळी वाऱ्यांमुळे शाळेचे पत्रे उडाले. यात शाळेचे (School) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला असून मात्र गावातील आदिवासी कुटुंबियांनी बांधकामासाठी साठवून ठेवलेल्या सिमेंट पाण्यामुळे भिजले आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे देखील आगमन झाले. याचा फटका अनेकांना बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरे पडल्याने आदिवासी कुटुंबीयांच्या प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्याची मंत्री बावनकुळे यांनी शेतात घेतली शाळा

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! सरकारचं मोठं आश्वासन; भविष्यातील पाणी, चारा...;

Housing Society : फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! आता ३ वर्षांत पुनर्विकास पूर्ण करावाच लागणार; नवीन नियम लागू

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT