नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीचे पाच लाख डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १४ लाख ९३ हजार ७२० लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ४ लाख ११ हजार २७३ नागरिकांनी (२७.५३ टक्के) लसीचा पहिला डोस घेतला; तर ९० हजार २६१ नागरिकांनी (६.४) दोन्ही डोस घेतले आहे. लसींचे असे एकूण ५ लाख १ हजार ५३४ डोस देण्यात आले आहेत. (nandurbar-news-coronavirus-cross-five-lakh-vaccination-in-district)
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याने २२ एप्रिलला लसीकरणाचा एक लाख, १२ मे रोजी दोन लाख, ९ जूनला तीन लाख आणि १ जुलै रोजी चार लाखाचा टप्पा पूर्ण केला होता. कोरोनापासून संरक्षणासाठी नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार तालुक्यात दीड लाख डोस
नंदुरबार तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ३० हजार २७४ व्यक्तींनी पहिला डोस तर ६ हजार ९६१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ६८ हजार ८६२ व्यक्तींनी पहिला तर २३ हजार १४० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ३ हजार ५१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि त्यापैकी २ हजार ४८९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ९ हजार ४४४ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर २ हजार ९५९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण १ लाख ४७ हजार ६४३ डोस देण्यात आले आहेत.
शहादा तालुक्यात सर्वाधिक डोस
शहादा तालुक्यात वयोगटातील १८ ते ४४ वयोगटातील २५ हजार ३७७ व्यक्तींनी पहिला तर १ हजार ८१४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील ६६ हजार ५४७ व्यक्तींनी पहिला तर २० हजार ८५५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ३ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी २ हजार ४२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ७ हजार ५८७ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर २ हजार ६९० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात असे एकूण १ लाख ३० हजार ३८२ डोस देण्यात आले आहेत.
चार तालुक्यातील लसीकरण असे
नवापूर तालुक्यात एकूण ९५ हजार ३२० व्यक्तींना डोस देण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यात एकूण ५४ हजार ७०३ डोस देण्यात आले आहेत. अक्कलकुवा तालुक्यात एकूण ४३ हजार ७९९ डोस देण्यात आले आहेत. तसेच धडगाव तालुक्यात एकूण २९ हजार ६८७ डोस देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी (पाहिला डोस) -१५ हजार ६१०
आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) -८ हजार ६११
कोरोना योद्धा कर्मचारी (पहिला डोस )- ४१ हजार २१८
कोरोना योद्धा कर्मचारी (दुसरा डोस )- १० हजार ७७९
१८ ते ४४ वयोगटातील (पहिला डोस )- १ लाख १ हजार ८०६
१८ ते ४४ वयोगटातील (दुसरा डोस )- ११ हजार ६६६
४५ वर्षावरील वयोगटातील ( पहिला डोस )- २ लाख ५२ हजार ६३९
४५ वर्षावरील वयोगटातील ( दुसरा डोस )- ५९ हजार २०५
नंदुरबार जिल्ह्यात एकूण लसीकरण - ५ लाख १ हजार ५३४
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.