Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: सातपुड्याच्या दुर्गम भागात काँग्रेसची पदयात्रा; भारत जोडो यात्रेची जनजागृती

सातपुड्याच्या दुर्गम भागात काँग्रेसची पदयात्रा; भारत जोडो यात्रेची जनजागृती

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या (Nandurbar) भारत जोडो यात्रेच्या प्रचारासाठी आणि यात्रेचा उद्दिष्ट सातपुड्याचा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी (Congress) काँग्रेसची पदयात्रा काढण्यात आली आहे. (Letest Marathi News)

काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी (K C Padvi) यांच्या नेतृत्वाखाली धडगाव आणि अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील दुर्गम भागात डोंगरदऱ्यातून काँग्रेस पक्षाच्यावतीने पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून घराघरात आणि दारादारात काँग्रेसचे विचार पोहोचवण्याचा उद्दिष्ट असल्याचा पाडवी यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेची तयारी

जिल्ह्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून त्या ठिकाणी आदिवासी संस्कृतीप्रमाणे त्यांचे स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे. याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील गावनिहाय आणि तालुका निहाय बैठकींना सुरुवात झाली असून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आमदार पाडवी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : मराठा समाजामुळे आमच्या ताटातील भाकर जाणारच; सरकारच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: श्रीगणरायला निरोप देण्यासाठी विविध सोयी-सुविधांसह बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज

Anant Chaturdashi 2025: गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी दान करा 'या' वस्तू, आर्थिक परिस्थिती सुधारेल

Student Death : पहाटेपर्यंत अभ्यास केला, सकाळी मृतदेह मिळाला; M.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वी मृत्यू

Chhagan Bhujbal: ओबीसींमध्ये मराठ्यांना घुसवलं का? मराठ्यांना आरक्षण कसं दिलं? छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?VIDEO

SCROLL FOR NEXT