Nandurbar News Congress Leader Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra Tomorrow In Maharashtra Sabha At Shivaji Park  Saam Digital
महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' उद्या महाराष्ट्रात धडकणार! शिवाजी पार्कवरील विराट सभेने होणार समारोप

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदूरबार|ता. ११ मार्च २०२४

Bharat Jodo Nyay yatra Maharashtra:

काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याय यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. उद्या दि. १२ मार्च रोजी नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल, या यात्रेची जय्यत तयारी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यादरम्यान, राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) उद्यापासून महाराष्ट्रात सुरू होणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात अमित देशमुख महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, खासदार के.सी.वेणूगोपाल, यांच्यासह अनेक नेते जिल्ह्यात येणार असून भारत जोडो यात्रेची तयारी करणार आहेत.

शिवाजी पार्कवर होणार विराट सभा..

तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची १७ मार्च रोजी मुंबई शिवाजी पार्क मैदानावर विराट सभाही होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व घटकपक्षांचे प्रमुख उपस्थित राहतील. राज्य सरकारकडून या सभेला परवानगी देण्यात आली आहे. सभेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आज सकाळी ११ वा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर येत असल्यामुळे लोकसभेची प्रचाराची सुरुवात नंदुरबार पासून करणार असून जिल्ह्यातील आदिवासी मतदारांना आपल्याकडे घेण्यासाठी काय आश्वासन देणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT