Corona Rules saam tv
महाराष्ट्र

Corona Rules: मास्क न वापरल्यास व थुंकल्यास भरावा लागणार दंड

मास्क न वापरल्यास व थुंकल्यास भरावा लागणार दंड

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास तसेच थुंकणाऱ्यांविरुध्द २०० रुपयांचा दंड (Corona Rules) करण्यात येणार आहे. मात्र, हाच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार असल्‍याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी दिले आहेत. (nandurbar news collector manisha khatri order penalty for not using mask and spitting)

शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीं तसेच संस्था, आस्थापना विरुध्द २७ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नंदुरबार (Nandurbar) जिल्हा अतिदुर्गम भाग असून तेथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन सामग्रीचा व इतर बाबी विचारात घेता या आदेशातील निर्बंध कायम ठेवून दंडाची रक्कम कमी आहे.

दंडाची रक्‍कम होणार दुप्‍पट

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्यांदा आढळल्यास २०० रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास ४०० रुपये, तर तिसऱ्यांदा आढळल्यास ५०० रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. असाच दंड शासकीय कार्यालयात, सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरल्यास देखील करण्यात येईल. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोना (Corona) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT