Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : गावातल्या विकास कामावरुन दोन गट भिडले; पोलीस स्टेशनमध्येच राडा

Nandurbar Police : नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली या गावातल्या विकास कामावरुन वाद निर्माण झाला आहे. या गावात सुरु असलेल्या विविध कामांमध्ये भ्रष्ट्राचाराचा आरोप एका गटाकडून करण्यात येत होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: गावचा विकास करण्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात असतात. यातून वाद निर्माण होत असतात. असाच प्रकार नंदुरबार जिल्ह्यात समोर आला असून विकास कामांवरून गावातील दोन गट आमनेसामने आल्याचे पाहण्यास मिळाले. वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर याठिकाणी देखील दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले.  

नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली या गावातल्या विकास कामावरुन वाद निर्माण झाला आहे. या गावात सुरु असलेल्या विविध कामांमध्ये भ्रष्ट्राचाराचा आरोप एका गटाकडून करण्यात येत होता. यासाठी त्यांनी आज पंचायत समिती नंदुरबारला घेराव आंदोलन घालण्याचा इशारा दिला होता. मात्र गावातील सत्ताधारी गट देखील पंचायत समितीमध्ये पोहचत त्यांनी गट विकास विकास अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून गावातील विकास कामात मुद्दाम रोडे आणले जात असल्याची तक्रार केली. 

दोन्ही गट पोलीस स्टेशनमध्ये पोहचले 

दरम्यान पंचायत समितीमध्ये दोन्ही गट समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर हा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. याठिकाणी देखील दोन्ही गट समोरा समोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत एका गटाला बाहेर काढले. तर दुसऱ्या गटाने ठाण मांडत आपली तक्रार पोलिसात केली.  

पोलीस स्टेशन आवारात गोंधळ 

या सगळ्या प्रकारानंतर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पंचायत समिती आणि शहर पोलीस स्टेशन आवारात अभुतपुर्व गोंधळ पहावयास मिळाला. या प्रकारानंतर संबंधीत तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले आहे. यानंतर गोंधळ कमी झाला आहे. मात्र विकास कामासाठी होणार वाद थांबणार कि पुन्हा उद्भवणार हे पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

SCROLL FOR NEXT