Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : चॉकलेटचे पैसे न दिल्याने बालकाला बेदम मारहाण; दुकानदाराविरोधात पोलीसात गुन्हा

Nandurbar News : नवापूर शहरात असलेल्या एका दुकानात दहा वर्षाचे दोन बालक चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेले. त्यांनी चॉकलेट घेतल्यानंतर पैसे न देता तिथून निघाले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : लहान मुलाने दुकानात जाऊन चॉकलेट घेतली. मात्र चॉकलेटचे पैसे दिले नाही. पैसे न दिल्याचा राग आल्याने दुकानदाराने बालकाला बेदम (Crime) मारहाण केल्याचा प्रकार (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे समोर आला आहे. या प्रकरणानंतर दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

नवापूर (Navapur) शहरात असलेल्या एका दुकानात दहा वर्षाचे दोन बालक चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेले. त्यांनी चॉकलेट घेतल्यानंतर पैसे न देता तिथून निघाले. दुकानदाराने दोघांनाही आरोड्या मारून चॉकलेटचे पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे न देताच निघून गेले. या गोष्टीचा राग येऊन दुकानदाराने त्यांच्या शोध घेतला पैसे का दिले नाही?त म्हणून बालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकानदारावर गुन्हा दाखल 

दुकानदाराने केलेल्या मारहाणीत बालकाला दुखापत झाली आहे. घडला प्रकार मुलाने घरी सांगितला. यानंतर बालकाला मारहाण केल्याप्रकरणी दुकानदारा विरोधात नवापूर शहर (Police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT