Nandurbar Chanshaili Ghat Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Chansaili Ghat : चांदशैली घाटावरील वाहतूक उद्यापासून महिनाभर बंद; दरड प्रतिबंधक उपाययोजनांचे काम हाती, शहाद्याकडून पर्यायी मार्ग 

Nandurbar News : चांदशैली घाट उद्यापासून महिनाभर राहणार बंद; दरड प्रतिबंधक उपाययोजनांचे काम हाती, शहाद्याकडून पर्यायी मार्ग 

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : तळोदा- शहादा मार्गावर असलेल्या चांदशैली घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. (Chandsaili) दरड प्रतिबंधक उपाययोजनांचे कामासाठी साधारण महिनाभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिले आहेत. यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक शहाद्याकडून वळविली आहे. (Live Marathi News)

सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा- धडगाव रस्त्याची ओळख आहे. मात्र या रस्त्यात असलेल्या चांदशैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसंखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दगड कोसळण्याची व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता (Nandurbar News) येत नाही. यादृष्टीने हा मार्ग आता महिनाभर बंद राहणार आहे. 

महिनाभर काम 

या मार्गावरील धोकादायक वळणावर गॅबियन संरक्षण भिंत उभारण्यासाठी मार्गावरील वाहतूक २८ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. येथून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आले आहेत. या संदर्भातला आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिला असून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आले आहे आली आहे.

पर्यायी मार्ग असा 

धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याला कमी अंतरात जोडणारा चांदशैली घाट हा दुरुस्तीच्या कामासाठी एक महिना बंद करण्यात आला आहे. यातच चांदसैली घाटातील मार्गाची बदल करण्यात आला असून या मार्गावरील वाहने शहादातर्फे नंदुरबार तर दुसरीकडून अक्कलकुवा मार्ग नंदुरबार असा मार्ग वळवण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

SCROLL FOR NEXT