Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: भल्‍या पहाटे मोठा आवाज आला अन्‌ सुरू झाली पळापळ; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात

भल्‍या पहाटे मोठा आवाज आला अन्‌ सुरू झाली पळापळ; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : गुजरात राज्यातील सुरत येथून मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या सुरत– खरगोन बसचा शहादा (Shahada) शहरातील 132 केवी सबस्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात (Accident) झाला आहे. अपघातात बस पलटी होऊन 15 प्रवासी जखमी झाले आहे. (Latest Marathi News)

सूरत येथून मध्‍यप्रदेशकडे जात असलेली बस शहादा सोडल्‍यानंतर काही अंतरावर गेल्‍यावर चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने बसला अपघात झाला. पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने आणि प्रवाशांनी मदतीची याचना करण्यासाठी गोंगाट केल्याने स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी मदतीसाठी धाव घेतली.

जखमी उपचारासाठी दाखल

पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांचे रेस्क्यू करण्यात आले. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून प्रशासनाच्यावतीने (Bus Accident) ठोस उपाययोजना करण्याची मागणी ही पुढे येत आहे. बसमधील जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT