Pune Bus Accident : तुळजापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; एक महिलेचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Tuljapur Pune Bus Accident: तुळजापूरहून पुण्याकडे जाणारी बस उलटली
Tuljapur Pune Bus Accident
Tuljapur Pune Bus AccidentSaam Tv

Pune News: देवदर्शन करून तुळजापूरहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या खाजगी बस खड्डयात उलटल्याने भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील मळद येथे शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Tuljapur Pune Bus Accident
Corona Cases in India: देशात कोरोनाचा धोका वाढला; 6 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद,14 जणांचा मृत्यू

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानीपेठ, लोहियानगर परिसरातील जवळपास 49 भाविक खाजगी बसमधून ( एमएच.12, एफसी. 9055 ) तुळजापूर व यरमाळा येथील देवीच्या दर्शनाला गेले होते.

देवदर्शन करून पुण्याकडे परत असताना दौंड तालुक्यातील मळद हद्दीतील घागरेवस्तीजवळ शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस मुख्य रस्ता व सेवा रस्त्याच्यामधील पावसाचे पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या मोरीमध्ये उलटली.  (Latest Marati News)

Tuljapur Pune Bus Accident
Sharad Pawar : अदानींचं योगदान मान्य करायला हवं, जेसीपीपेक्षा सुप्रीम कोर्ट विश्वासाहार्य : शरद पवार

एका महिलेचा मृत्यू

या बस अपघातात बसमध्ये प्रवाशी अंगावर पडून खाली सापडल्याने एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी पंचवीस ते तीस भाविक जखमी झाले असून त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

नाशिकमध्ये एसटी बसच्या अपघात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी नाशिक-चावंड तालुक्यातील आसरखेडा जवळ एसटी बसचा अपघात झाला होता. वाणी गडावरून मनमाडकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला चांदवड जवळच्या मतेवाडी जवळ अपघात होऊन यात महिला कंडकटरचा मृत्यू झाला.

या अपघातात 4 ते 5 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर काही प्रवाशांना मार लागलाय. या सर्व प्रवाशांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात एसटी बसचा अक्षरशः चुराडा झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com