Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News : लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून; शेतातील बांधावरील झाडाच्या हिश्‍शावरून वाद

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून; शेतातील बांधावरील झाडाच्या हिश्‍शावरून वाद

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : वडिलोपार्जित शेताच्या बांधावर असलेले सागाचे झाड सामुदायिक असून, त्याच्या हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावावर धारदार कोयत्याने मानेवर व पाठीवर वार करून (Nandurbar) जागीच ठार केले. इतरांनी सोडविण्यासाठी गेलेल्यांनाही मारहाण करून ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन जण जखमी झाले. याबाबत धडगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

धडगाव तालुक्यातील कमोद बुद्रुक येथे ही घटना घडली. कमोद बुद्रुक (ता. धडगाव) येथे रमेश दादला पावरा (वय ५०) व थिक्या दादला पावरा (वय ४१) या दोघा भावांचे वडिलोपार्जित शेतीतून दोन हिस्से पाडण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही हिश्‍शांच्या शेताच्या बांधावर सागवान झाड आहे. या झाडाच्या हिस्से वाटणीवरून दोन्ही भावंडे व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शेतातच वाद झाला. त्यानंतर घरी आले. मात्र रात्री आठच्या सुमारास पुन्हा दोघा भावांमध्ये वाद सुरू झाला.

रात्री घरावर हल्ला करत वाद

वादात थिक्या पावरा या लहान भावाने व त्याची मुले, पत्नी आणि नातेवाईक यांनी रमेश पावरा यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात थिक्या पावरा याने त्याच्याकडे असलेल्या धारदार कोयत्याने रमेशच्या मानेवर वार केला. त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर जोरदार वार केले. त्यात रमेश पावरा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर रमेश पावरा यांचा मुलगा दिनेश रमेश पावरा (३६) व नातू अंकेश दिनेश पावरा (१०) यांनी रमेश पावरा यांना थिक्या पावरा याच्या तावडीतून सोडविण्यासाठी धाव घेतली असता थिक्या पावरा याच्या मुलांनी व पत्नीने त्या दोघांवरही काठीने व सळईने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. घटनेत रमेश पावरा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच थिक्या पावरा व त्याच्या कुटुंबीयांनी पोबारा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

ज्ञानेश कुमार हटवा, SIR याद्या गोठवा; मुंबईतील आंदोलनापूर्वी दिपकेंची मागणी

SCROLL FOR NEXT