mahavitaran
mahavitaran 
महाराष्ट्र

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्‍या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : महाविरण बिल वसुली मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण (Mahavitaran) कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्‍याचा प्रकार नंदुरबार (Nandurbar) शहरात घडला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नंदुरबार शहरातील मेहतर वस्तीत थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अभियंता गोपाल वराडे हे पथकासह शहरातील मेहतर वस्तीत थकीत वीज बिल वसुली कारवाईसाठी गेले असता त्यांच्‍याशी वाद घातला.

जमाव जमवून मारहाण

वसुलीसाठी आलेल्‍याचे वाईट वाटून सागर कडोसे व रवि डागोर हे या पथकाजवळ येवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आम्ही बिल भरणार नाही व वीज कनेक्शनही कट करू देणार नाही असे सांगत. बेकायदेशीर जमाव जमवून सहाय्यक अभियंता गोपाल वराडे, निलेश माळी यांना काठीने मारहाण करत चंद्रशखेर जगताप, रविंद्र देवाजी गावीत यांना शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक अभियंता गोपाल रमेश वराडे (रा. विद्यानगर, नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सागर सुखदेव कडोसे, रवि शाम डागोर व गल्लीतील ८ ते १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी सागर कडोसे व रवि डागोर यांना अटक केली असून पुढील तपास पोसई मनोज पाटील करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

Pune PM Narendra Modi Rally: ६० वर्षांत काँग्रेसला जे करता आलं नाही ते आम्ही केलं, PM मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

SCROLL FOR NEXT