Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

माउंट एवरेस्ट चढाईसाठी सातपुड्यातील गिर्यारोहक अनिल वसावे यांची निवड

माउंट एवरेस्ट चढाईसाठी सातपुड्यातील गिर्यारोहक अनिल वसावे यांची निवड

दिनू गावित

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील रहिवासी सातपुड्याचे सुपूत्र अनिल वसावे आता जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणार आहेत. या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक (Nandurbar News) करण्यात येत आहे. (nandurbar news Anil Vasave has been selected for climbing Mount Everest)

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्या मार्गदर्शनाखाली ७ एप्रिल ते ७ जून २०२३ दरम्यान चढाई करणार आहेत. अनिल वसावे यांनी आतापर्यंत अफ्रिका खंडांतील उंच शिखर किलोमांजरी व युरोप खंडातील उंच शिखर माऊंट एलबर्स व माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केले आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले आदिवासी तरुण आहेत.

३५ लाख रक्कमेची आवश्यकता

आता जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन एक नवीन कामगिरी करून तो सातपुड्याच्या नाव उंचावणार आहे. अनिल वसावे यांना विविध मोहिमांसाठी आतापर्यंत मित्रपरिवार व आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात आली असून माउंट एवरेस्ट चढाई करण्यासाठी आता त्याला ३५ लाख एवढी मोठी रक्कमेची आवश्यकता आहे. त्यासाठी शासन, विविध कंपन्या, मित्रपरिवार आणि संस्थांकडे अनिल वसावे यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT