Prakasha Nandurbar Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: प्रकाशा येथे खोदकामात आढळली दहाव्या शतकातील पुरातन मूर्ती

प्रकाशा येथे खोदकामात आढळली दहाव्या शतकातील पुरातन मूर्ती

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना एक पुरातन मूर्ती सापडली. ही मूर्ती दहाव्या शतकातील (Nandurbar News) असल्याचा अंदाज स्थानिक नागरिक आणि इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मूर्ती सापडल्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली असून याची माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली आहे. (Live Marathi News)

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशाची (Prakasha) ओळख दक्षिण काशी म्हणून आहे. या ठिकाणी अनेक वेळा खोदकाम करताना पुरातन वस्तू सापडले आहेत. पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना या ठिकाणी एक पुरातन मूर्ती सापडली. ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मूर्ती ध्यानस्थ अवस्थेत असून तिच्या चारी हातात शस्त्र आहेत. त्यामुळे ही मूर्ती नेमकी कोणत्या देवाची हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारीही या ठिकाणी भेट देणार आहेत.

नागरीकांची पुजेसाठी गर्दी

गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी मूर्ती ज्या ठिकाणी सापडले. त्या ठिकाणी पूजा करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मूर्ती ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा निर्धार केला. प्रकाशा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीशी साम्य असलेल्या अनेक पुरातन वस्तू सापडत असतात. पुरातत्त्व विभागाने प्रकाशा परिसरात उत्खनन करून या ठिकाणी सापडणाऱ्या वस्तू कोणत्या शतकातील आहेत; याचा अभ्यास करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

Satara Famous Food: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

Gold Rate Today: सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT