Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: आमदार आले दारी; अक्कलकुवा तालुक्यातील जनतेने मांडले गाऱ्हाणी

आमदार आले दारी; अक्कलकुवा तालुक्यातील जनतेने मांडले गाऱ्हाणी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार आमश्‍या पाडवी यांनी ‘आमदारांची वारी, आली आपल्‍या दारी’ (Nandurbar) उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतंर्गत (Akkalkuwa) अक्‍कलकुवा तालुक्‍यात झालेल्‍या जनता दरबारात नागरीकांनी आमदारांपुढे आपल्‍या समस्‍यांची गाऱ्हाणी मांडली. (Maharashtra News)

विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी त्यांच्या संकल्पनेतून सामान्य जनतेच्या विविध समस्या तात्काळ सोडविण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने अक्कलकुवा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारात तालुक्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्याकडुन वर्षभराच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला.

जागेवरच सोडविले प्रश्‍न

जनता दरबारात आलेल्या सामान्य नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यांचे म्हणणे ऐकुन जागेवर त्यांच्या समस्या व प्रश्न देखील सोडविण्यात आले. त्यामुळे अनेक महिन्यांपासुन आपल्या कामासाठी विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोजा परिसरात १ कोटींचे अमली पदार्थ जप्त, २ जणांना अटक

Sambhajinagar Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Viral Video: लग्नातील बुफे सोडून मॅगीवर तुटून पडले पाहुणे; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय; सचिन तेंडुलकरला बाद ठरवून चूक केली, अंपायर स्टीव्ह बकनरला २२ वर्षांनी पश्चाताप

Accident CCTV Video: बाईक घसरली अन् डोकं थेट डंपरच्या चाकाखाली, कल्याण–मुरबाड रोडवर भयंकर अपघात

SCROLL FOR NEXT