Nandurbar Politics Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Politics : नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत वादाची शक्यता; शिंदे गटाचा जिथे दावा त्याच जागेंवर अजित पवार गटाने केला दावा 

Nandurbar news : सक्षम उमेदवार असल्याने हे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावे; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली विधानसभा क्षेत्रात दावा केला जात आहे. दरम्यान जागा वाटपावरून महायुतीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात अलबेल चित्र असल्याचे दिसून येत नाही. शिंदे गटाने दावा सांगितलेल्या अक्कलकुवा आणि नवापूर या दोन मतदार संघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर आणि अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सक्षम उमेदवार असल्याने हे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावे; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केली आहे. दरम्यान शिंदे गटाने अगोदरच दावा केलेल्या दोघी मतदार संघांवर आता (NCP) राष्ट्रवादीने ही दावा केल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

सक्षम उमेदवार असल्याने अजित पवार गटाचा आग्रह  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघी जागा लढवणार असून आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याने आम्ही या जागा सोडणार नाहीत. मागील निवडणुकीत (Navapur) नवापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विचाराच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सक्षम पर्याय आपल्याकडे असल्याने या दोघी जागा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादी आग्रही असल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT