Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : धनगर आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनाची धग ग्रामीण भागातही; शेकडो ग्रामस्थांकडून निषेध रॅली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: मराठा आरक्षणानंतर धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी आंदोलन छेडले आहे. मात्र या आरक्षाणाच्या (Dhangar Reservation) विरोधाची धग ग्रामीण भागात देखील पोहचली असून, नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील निमगाव येथे शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीत आदिवासी बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. (Live Marathi News)

धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती आणि आदिवासी समाजाच्या यादीत समाविष्ट करू नये; या मागणीसाठी जिल्ह्यातील गाव पाड्यांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष पाहण्यास मिळत आहे. आता या आंदोलनाची धग आदिवासी गाव पाड्यांवर ही पाहण्यास मिळत आहे नंदुरबार तालुक्यातील निमगाव येथे गावातील शेकडो आदिवासी बांधवांनी सरकारच्या आदिवासी विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सहभागी झाले होते.  

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात धनगर आरक्षणाच्या विरोधात आंदोलन तीव्र होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे चित्र असून जिल्ह्यात येत्या काळात या विषयावर तीव्र आंदोलन होतील असे संकेत ग्रामीण भागातील या आंदोलनांनी मिळत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT