Nandurbar Rain Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Rain : नंदुरबार शहरासह परिसरात जोरदार पाऊस; तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यासह परिसरात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज पुन्हा नंदुरबार शहरासह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यासह परिसरात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाय शेतीची कामे देखील थांबली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. तीन दिवसांपासून पाऊस (Rain) नाल्याने शेतीच्या कामांना देखील वेग आला होता. शेतातील रखडलेली कामे पूर्ण करण्याची लगबग सुरु झाली होती. दरम्यान आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. 

आज दुपारच्या सुमारास आलेल्या (Heavy Rain) जोरदार पावसामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. मागील आठड्यात झालेल्या पावसामुळे सद्य स्थितीत विरचक धरणात पस्तीस टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु धारण भरण्यासाठी आणखी दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडचणीतून वाट काढावी लागणार; वृश्चिकसह ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Delhi Car Blast: दिल्ली स्फोटाचं पाक कनेक्शन उघड? डॉक्टर शाहीना हल्ल्याची मास्टरमाईंड?

महायुती फुटली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? दोन्ही NCP आवळणार भाजपविरोधात वज्रमूठ?

Solapur Municipal Corporation: निवडणूक आरक्षण जाहीर; दिग्गजांना धक्का,आरक्षणामुळे वाढल्या अडचणी

Skin Care: वारंवार चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाइप्स वापरणं आहे धोकादायक, होऊ शकतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT