Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

सागवान लाकडासह २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्‍त; धडगाव वन विभागाची कारवाई

सागवान लाकडासह २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्‍त; धडगाव वन विभागाची कारवाई

दिनू गावित

नंदुरबार : जंगलातून सागवान लाकडाची तस्‍करी होत असल्‍याची गुप्‍त माहिती मिळाली. या माहितीच्‍या आधारे केलेल्‍या कारवाईत धडगाव वन विभागाने (Dhadgaon Forest Department) सागवान लाकडासह २ लाख ८२ हजार १६६ रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. (Nandurbar News Forest Department Action)

वन क्षेत्रपाल अक्राणी व रेंज स्टाफ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शैलकुई- राजबर्डी रस्त्यावर गस्त करत असतांना (Forest Department) संशयित वाहन (क्र. एमएच 04, ईएल 8646) निदर्शनास आले. सदर वाहनास अटकाव केला असता वाहन चालक वाहन थांबून पसार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता यात साग चौपाट 92 नग 1.054 घनमीटरचे लाकून आढळून आले. 31 हजार 620 रुपये किंमतीची साग व बेलखेचे 15 नग 546 रूपये असा एकूण 32 हजार 166 रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल व अडीच लाख रुपये किंमतीच्‍या पीकपसह एकुण 2 लाख 82 हजार 166 रूपयाचा मुददेमाल जप्त करुन सदर वाहनासह धडगाव टिंबर डेपोत पावतीने जमा करून कारवाई करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही सदर कार्यवाही वनसंरक्षक दि. वा. पगार (धुळे), उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील (नंदुरबार वनविभाग शहादा), सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे (रोहयो) अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्राणी वनक्षेत्रपाल चारुशीला काटे, माकडकुंडचे वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक गुलाबसिंग तडवी (पिंपरी), वनरक्षक अनिल पाडवी (‍धडगाव) व वनरक्षक मांगा वळवी (अटटी) यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT