Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : परदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने १० लाखात फसवणूक

Nandurbar News : नंदुरबार शहरातील अल्तमश अबुल्हासात पीरजादा यांची फसवणूक झाली आहे. पीरजादा यांची सुरत येथील रहिवासी किस्मत बलराज सोनी व कपिल बलराज सोनी यांच्याशी ओळख

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : बेरोजगार असलेल्या तरुणांना हेरून नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. असाच प्रकार (Nandurbar) नंदुरबारमध्ये समोर आला असून या प्रकरणात परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली आहे. 

नंदुरबार शहरातील अल्तमश अबुल्हासात पीरजादा यांची फसवणूक (Fraud) झाली आहे. पीरजादा यांची सुरत (Surat) येथील रहिवासी किस्मत बलराज सोनी व कपिल बलराज सोनी यांच्याशी ओळख होती. या ओळखीतून पीरजादा यांच्या नातेवाईकांना परदेशात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. याकरिता काही रक्कमेची मागणी केली. असे करत दोन्ही भावंडांनी पीरजादा यांच्याकडून दहा लाख १४ हजार रुपये उकळून घेतले. 

दरम्यान पैसे घेऊन देखील दोघा भावंडांनी ना युवकांना नोकरी लावली नाही. शिवाय दिलेले पैसे देखील परत केले नाही. त्यामुळे नोकरीच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अल्तमश अबुल्हासात पीरजादा यांनी नंदुरबार पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून दोन्ही सोनी बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT