Navapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Navapur Crime News : आठवडे बाजारातच पतीकडून पत्नीवर शस्त्राने हल्ला करीत खून; भर दुपारी घडलेल्या घटनेने खळबळ

Nandurbar News : बाजारात बबीता गावित ही देखील बाजारासाठी आली असता तिच्यावर अशोक गावित यांने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली होती

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आठवडे बाजार असल्याने बाजारासाठी गर्दी असते. या गर्दीत भर दिवसा पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात सदर महिला गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. बाजाराच्या गर्दीत भर दिवस घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील आठवडे बाजारात आजूबाजूच्या परिसरातील नागरिक बाजारासाठी येत असतात. याच बाजारात बबीता गावित ही देखील बाजारासाठी आली असता तिच्यावर अशोक गावित यांने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी महिलेला उपचारासाठी विसरवाडी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार (Nandurbar) रुग्णालयात रेफर केले. त्यावेळी खाजगी वाहनाने नातेवाईकांनी सदर जखमी महिलेस नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठले, नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार उपचार दरम्यान बबीताची प्राणजोत मावळली आहे.

पोलिसांनी पाटील घेतले ताब्यात 
पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने (Crime News) मृत महिला बबीता गावित हि दोन महिनाभरापासून दापूर येथे आई- वडिलांकडे राहायला गेली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर बाजारात गेली असता तिच्यावर हल्ला करण्यात आला. अशोक ताऱ्या गावित (रा. ढोरपाडा ता. नवापूर) असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती अशोक गावित यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस  करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT