Arrest , Nandurbar, LCB , Police, youth Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबारच्या सराफास लुटणाऱ्या सहा युवकांना बदलापूरात अटक

धुळ्यात रचला हाेता कट.

दिनू गावित

Nandurbar News : नंदुरबार तालुक्यातील वळवद ते उमर्दे रस्त्यावर बंदुकीचा धाख दाखवून सराफाला लुटणाऱ्या टोळीतील सहा संशयितांना अटक (arrest) करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. १६ सप्टेंबरला ही घटना घडली होती. नंदुरबार व निजामपूर पोलिसांनी (police) पाठलाग केल्यानंतर दरोडेखोरांनी कार व चोरलेला ९ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल सोडून पलायन केले होते. (Nandurbar Latest Marathi News)

16 सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास वळवद उमर्द दरम्यान म्हशींच्या तबेल्याजवळ रोडवर रुपेश सुमनलाल सोनार हे त्यांचे कोपर्ली येथील सोने चांदी विक्रीचे दुकान बंद करन त्यांच्या मित्रासह वाहनातून घरी नंदुरबारला निघाले हाेते. त्यांच्या गाडीच्या पुढे एक चार चाकीतून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीला अडवून त्यांना लुटलं हाेते.

याची माहिती साेनार यांनी त्यांच्या मित्रास दिली हाेती. त्यांच्या मित्रानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी तत्काळ पथक रवाना केले हाेते. पाेलिसांनी चोरांचा पाठलाग केला होता. त्यामुळे घाबरलेल्या चाेरट्यांनी वाहन शेतात सोडून पळ काढला हाेता. त्यावेळी चाेरीचा मुद्देमाल देखील शेतातच टाकून दिल्याचे पाेलिसांना आढळलं हाेतं.

यावेळी पोलीसांनी 9 लाख 76 हजार 720 रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने, रोख रूपये मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली चार चाकी ताब्यात घेतली. त्यानंतर पाेलिसांनी चाेरट्यांचा शाेध लावण्यासाठी कंबर कसली. त्यासाठी वेगवेगळी सहा पथकं तयार करण्यात आली. पाेलिसांनी तपासाची गती वाढवत गुप्त माहितीच्या आधारे संशयीत आरोपींना बेड्या ठाेकल्या.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार : पाववा आखाडे याने त्याचे साथीदार गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दिपक ठाकरे, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बाँबी बैसाने (सर्व राहणार नंदुरबार) यांनी घटनेच्या दोन दिवसापुर्वी कट रचून धुळे येथील मनोज पारेराव याच्या सांगण्यावरून सत्तार मेंटल, वसिम बाटला, बापू, पप्पू व अनोळखी एक इसम (सर्व राहणार धुळे) असे सर्वांनी मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले.

नंदुरबार येथील गोविंदा सामुद्रे, मुकेश ठाकरे, दीपक, विकास ऊर्फ नागू ठाकरे, बॉबी बैसाणे यांचा शोध घेतला असता ते बदलापूर येथे पळून गेल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हेचे एक पथक तात्तकाळ बदलापूरात रवाना झाले. तेथे त्यांनी बुधवारी स्थानिक पोलीसांच्या मदतीनं गोविंदा यशवंत सामुद्रे, मुकेश शामा ठाकरे, विकास ऊर्फ नागू अशोक ठाकरे (तिन्ही रा. चिंचपाडा मिलाटी, नंदुरबार) तसेच विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे (वय 24 रा. समता नगर, नंदुरबार) यांना ताब्यात घेतलं. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याचे पाेलिसांनी सांगितलं.

दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपीतां गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसंच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत असेही पाेलिस दलानं नमूद केले.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश बसावे, पोलीस नाईक विशाल नागरे, मोहन इमढेरे, राकेश मोरे, मनोज नाईक, सुनिल पाडवी, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे राजेंद्र काटके, अभिमन्यु गावीत, रामेश्वर चाण यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT