नंदुरबार : पालकमंत्री पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त मेंढपाळांची भेट! दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार : पालकमंत्री पाडवी यांनी घेतली नुकसानग्रस्त मेंढपाळांची भेट

नंदुरबार जिल्ह्यात 276 मेंढ्यांच्या मृत्यूची नोंद!

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासुन अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर झालेल्या नुकसानीची आज जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. के.सी पाडवी यांनी पाहणी केली आहे. जिल्ह्यात या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.

हे देखील पहा :

अवकाळी पावसाने व प्रचंड थंडीमुळे जिल्ह्याभरात 276 मेंढ्या दगावल्या आहेत. अवकाळी पावसाने एक गाय देखील यात मृत झाल्याची घटना समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ऍड.के.सी पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील एका ठेल्लारीच्या कळपाला भेट दिली.

येथील परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. या मेंढपाळांना कोणत्या शासकीय योजनांमधून मदत मिळेल याबाबत कृषी अधिकारी यांना सुचना देऊन या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Train Accident : अंगावर काटा आणणारा रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेन थेट मालगाडीवर चढली, लोको पायलटसह ११ प्रवाशांचा मृत्यू

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT