Nandurbar Political News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : ‘जनतेने हुकूमशाहीला जागा दाखवली', महायुतीतला वाद संपेना; शिंदेच्या नेत्याचा भाजप आमदारावर निशाणा

Nandurbar Political News : नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रत्ना रघुवंशी ११ हजार मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या असून शिंदे गटाची ताकद जिल्ह्यात वाढली आहे

Alisha Khedekar

  • नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय

  • रत्ना रघुवंशी ११ हजार मतांनी नगराध्यक्षपदी विजयी

  • शहादा, नवापूर, तळोद्यातही शिवसेनेची ताकद वाढली

  • जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय पकड अधिक मजबूत

सागर नाईकवाडे, नंदुरबार

नुकत्याच पार पडलेल्या नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असून, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी या 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

या विजयानंतर साम टीव्हीला मुलाखत देताना शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी नाव न घेता भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात एका विशिष्ट कुटुंबाची हुकूमशाही सुरू होती, ज्यांनी संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले होते. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आपला संताप व्यक्त केला असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नंदुरबार जिल्हयातील इतर नगरपरिषदांबाबत बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, केवळ नंदुरबारच नव्हे तर शहादा आणि नवापूरमध्येही शिवसेनेच्या विचारसरणीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तळोदा नगरपरिषदेतही शिवसेनेची ताकद वाढली असून तिथे भाजपपेक्षा शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत.जर काही तांत्रिक अडचणी आल्या नसत्या, तर चारही नगरपरिषदांवर शिवसेनेचा एकहाती विजय झाला असता असा दावाही त्यांनी केला.

पुढील पाच वर्षांच्या नियोजनाबद्दल बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, निवडणूक काळात शहराच्या जनतेला जी आश्वासने दिली आहेत, ती सर्व पूर्ण केली जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्यात येतील. नंदुरबार नगरपरिषदेवरील या विजयामुळे जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिरकी गोलंदाजी, शेवटच्या षटकांत तुफानी फटकेबाजी; ५ आयपीएल संघांकडून खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती

Local Body Election: पालिका निवडणुकीत भाजप नंबर १ चा पक्ष कसा ठरला, कुणाला क्रेडिट आणि कसा होता प्लान?

Amboli Recipe : कोकण स्पेशल आंबोळी कशी बनवायची? 'हे' आहे पारंपरिक रेसिपीचे सीक्रेट

Tuesday Horoscope : अडचणी स्वीकारून मार्ग काढावे लागेल; ५ राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे अन्यथा...

इलेक्शन मॅनेज करू नका, फुकटाची दारू पाजू नका, नितीन गडकरींचा भाजपच्या सभेत घरचा आहेर|VIDEO

SCROLL FOR NEXT