Dhadgaon News Saam tv
महाराष्ट्र

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Nandurbar News : अंगणवाडी मदतनीस पदावर मागील महिन्यात एका महिलेची नियुक्ती करण्यात आली. सदर महिला कामावर हजार झाली. दरम्यान मदतनीस पदासाठी अर्ज केल्यानंतर निवड न झाल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील महिन्यात अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड झाली असताना दिलेल्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील निमखेडी गावात समोर आली आहे. सुनेची नियुक्ती झाली नसल्याच्या रागातून हि मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी सदर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील निमखेडी गावात असलेल्या अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 मध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. सदर अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये अंगणवाडी मदतनीस पदावर मागील महिन्यात एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार सदर महिला याठिकाणी कामावर हजार झाली आहे. दरम्यान मदतनीस पदासाठी अर्ज केल्यानंतर निवड न झाल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. 

महिलेसह कुटुंबियांना देखील मारहाण 
आपल्या सुनेची अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड झाली नाही. हा राग मनात धरून एका व्यक्तीने आणि त्याच्या साथीदारांनी थेट अंगणवाडीत घुसून नवनियुक्त मदतनीस महिलेला बेदम मारहाण केली आहे. तर केवळ पीडित महिलेलाच लक्ष्य केले नाही; तर तिच्या कुटुंबीयांना देखील मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

दहा जणांविरोधात गुन्हा दाखल 
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. या प्रकरणात तब्बल दहा आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर पीडित महिलेने तात्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत दहा जणांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

कुणाला नकोय राष्ट्रवादीचं विलिनीकरण? अजितदादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या चर्चेला जोर

Sangli Accident: हिट अँण्ड रनचा थरार; मद्यधुंद कार चालकाने १४ ते १५ जणांना उडवलं

SCROLL FOR NEXT