Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : ताप्ती गंगा एक्सप्रेस मधल्या हल्ल्यातील एका जखमीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

Nandurbar News : अतिरक्त स्त्राव झाल्याने रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला असून लोहमार्ग पोलीसांनी रात्री उशीरा या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेतील आरोपी अद्याप फरार आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये बसण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊन या वादात एकाने दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडली होती. यात दोघेजण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर मृताचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत.  

चेन्नईहून जोधपुरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये भुसावळवरून चढलेल्या एका प्रवाशाची रेल्वेत अगोदरच बसलेल्या दोन राजस्थानी प्रवाशांसोबत बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. या वादातून संबंधिताने नंदुरबार रेल्वे स्थानकावर आपल्या मित्रांना बोलावून दोन प्रवाशांवर हल्ला केला होता. यात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू 

दरम्यान या घटनेत जखमी असलेल्या दोघांमधील सुमेरसिंग जबरसिंग (वय २४) या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. अतिरक्त स्त्राव झाल्याने रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला असून लोहमार्ग पोलीसांनी रात्री उशीरा या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेतील आरोपी अद्याप फरार आहे. तर दुसऱ्या जखमी प्रवाशावर उपचार सुरु आहेत. तर घटनेतील मृत झालेल्या तरुणाचे २० फेब्रुवारीला विवाह होता. 

मृताचे नातेवाईक आक्रमक 
चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. यावेळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोर करनी सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस देखील येथे दाखल झाले असून पोलीस आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT