Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये भर रस्त्यावर लुटमारी; महिलांच्या हातातून मोबाईल लांबवत चोरटे पसार

Nandurbar News : अज्ञात व्यक्ती तोंडाला मास्क लावलेले व नंबर नसलेल्या मोटर सायकलवर आले होते. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावला व पुढे पळून गेले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहरात चोरट्यांनी दहशत वाढली आहे. दुपारच्या सुमारास भर रस्त्यावर लुटमारीच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरटे दुचाकीने पसार होत आहेत. असाच प्रकार शहरातील चित्ते नगर परिसरात घडला आहे.

नंदुरबार (Nandurbar) शहरातील चित्ते नगर येथे एका महिलेच्या हातातून २ अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येत मोबाईल हिसकावून नेला. नंदुरबार शहरातील चित्तेनगर परिसरातून जात असलेल्या या महिलेच्या मोबाईल असताना अज्ञात व्यक्ती तोंडाला मास्क लावलेले व नंबर नसलेल्या मोटर सायकलवर आले होते. (Crime News) दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावला व पुढे पळून गेले. ही घटना उपनगर पोलीस चौकी पासून २०० मीटर अंतरावर घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

सदरच्या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात आता रहदारीच्या वेळेत स्नॅचिंगचे प्रकार घडत असल्याने लोकांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. सध्या शहरात गुन्हेगारी वाढतांना दिसून येत आहे. या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar vs Sharad pawar : बारामतीचा वाली कोण? शरद पवारांनंतर मीच वाली, दादांचं वक्तव्य, साहेबांकडून समाचार

Navneet Rana Rally Rada : दर्यापूरमध्ये राडा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या, सभेत मोठा गोंधळ

Today Horoscope: हितशत्रूपासून सावध रहाणं गरजेचं, वाचा आजचं राशीभविष्य

Success Story: झाडूने बदललं आयुष्य, २५ हजारात सुरु केला व्यवसाय, आज कमावते १२ लाख रुपये, सोनिकाची सक्सेस स्टोरी वाचा

Maharashtra Election: अजित पवारांविरोधात प्रतिभा पवार मैदानात; दादांचा सवाल, पवारांचा पलटवार

SCROLL FOR NEXT