Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News: पती-पत्नीच्या भांडणात शेजारणीचा गेला जीव; फॅनच्‍या दांड्याने मारहाण

पती-पत्नीच्या भांडणात शेजारणीचा गेला जीव; फॅनच्‍या दांड्याने मारहाण

साम टिव्ही ब्युरो

धडगाव (नंदुरबार) : पती त्यांच्या पत्नीसह मुलांना मारहाण करीत असतांना ते भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेजारी महिलेलाच सिलिंग फॅनच्या लोखंडी रॉडने मारून खून (Crime News) केल्याची घटना घडली. सदर घटना अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील भांग्रापाणी येथे घडली. याबाबत मोलगी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

भांग्रापाणी (नंदुरबार) येथे ११ एप्रील रात्री अकरा ते बाराच्या सुमारास वसंत होमा वसावे हा त्याची पत्नी व मुलांना राहत्या घरी मारहाण करीत होता. या दरम्‍यान शेजारी राहत असलेली सिंदाबाई सेमट्या वसावे व सेमट्या पारशी वसावे हे भांडण सोडविण्यास गेले. याचा राग येऊन वसंत वसावे याने सीलिंग फॅनच्या लोखंडी मोटारीसह असलेल्या दांड्याने तोंडावर व पायावर मारून गंभीर दुखापत केली.

महिलेचा मृत्‍यू

या मारहाणीत सिंदाबाई सेमट्या वसावे (वय ६०) यांचा मृत्‍यू झाला, तर सेमट्या पारशी वसावे यास देखील गंभीर दुखापत करून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून सेमट्या वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलिस ठाण्यात वसंत होमा वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT