Nandurbar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime News: दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाही; बापाने ४ महिन्याच्या मुलीसोबत केले भयानक कृत्‍य

दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाही; बापाने ४ महिन्याच्या मुलीसोबत केले भयानक कृत्‍य

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र तिने पैसे दिले नाही. या कारणाने स्वतःच्या चार वर्षीय बालिकेला जमिनीवर आपटुन तिचा गळा दाबून हत्या (Crime News) केली. बापाच्‍या या (Nandurbar News) भयानक कृत्‍याने खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

लक्कडकोट (ता. शहादा) येथे सोमनाथ पाडवी (वय २४) हा पत्‍नी व मुलीसह वास्‍तव्‍यास होता. त्‍याला दारूचे व्‍यसन असल्‍याने त्‍याने पत्नी भारती सोमनाथ पाडवी हिच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र पत्‍नी भारती हिने पैसे दिले नाही. त्याचा राग मनात धरून झोपलेल्या चार वर्षी रुचिता पाडवी या बालिकेला जमिनीवर (Crime News) आपटले. तसेच तिचा गडा दाबून खून केला.

पत्‍नीने दिली पोलिसात फिर्याद

सदरची खळबळजनक घटना २ जानेवारीला घडली. या प्रकरणी ३ जानेवारी रोजी आरोपीची पत्नी भारती पाडवी हिने पोलिसात (Police) धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT