Shahada Accident Saam tv
महाराष्ट्र

Shahada Accident : भरधाव कार दुचाकींना उडवत सुसाट; शहाद्यात थरार, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Nandurbar News : पुण्याचा हिट अँड रुंच्या घटनेनंतर नागपूर, भंडारा शहरात देखील हिट अँड रनचा थरार पाहण्यास मिळाला आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात मोठा अपघात घडला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन च्या थरारक घटनेला महिनाभराचा कालावधी होत असताना शहाद्यात देखील अशीच थरारक घटना घडली आहे. रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्यावरील १५ ते २० दुचाकींना धडक देत उडवत गेली. तर चारचाकी वाहनांना देखील धडक दिल्याने यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. 

पुण्याचा हिट अँड रुंच्या घटनेनंतर नागपूर, भंडारा शहरात देखील हिट अँड रनचा थरार पाहण्यास मिळाला आहे. यानंतर नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहरात मोठा अपघात घडला आहे. शहरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर नागरिकांची चांगलीच वर्दळ असताना अचानक एक भरधाव वेगाने येणारी कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या १५ ते २० मोटरसायकलींना जोरदार धडक (Accident) दिली आहे, यामुळे मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या गाडीचे देखील नुकसान झाले आहे. मोटारसायकलींना उडविल्यानंतर कर चालकाने पुढे जाऊन कार थांबविली होती. 

कारवरील ताबा सुटल्याने अपघात 

कार भरधाव वेगाने जात असताना वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वाहन चालकाला अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SSC Success Story: दररोज 2 किमीची पायपीट,कंदिलाच्या उजेडात अभ्यास; दहावीत 94.20% गुण मिळवणाऱ्या वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी कहाणी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलेले समुद्री सौंदर्य, 'या' बीचवर एन्जॉय करा वीकेंड, कडक उन्हात अनुभवाल थंडगार हवा

SCROLL FOR NEXT