Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : भरधाव बस मेंढ्याच्या कळपात घुसली; १३ मेंढ्यांचा मृत्यू, नंदुरबार- नवापूर रस्त्यावरील घटना

Nandurbar News : नंदुरबार ते नवापूर मार्गावर आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. दरम्यान खामगाव शिवारात मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार ते नवापूर रस्त्यावर खामगाव शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांच्या कळपास भरधाव वेगातील एसटी बसने धडक देत चिरडले. यात १३ मेंढ्या जागीच ठार झाल्या. तर काही मेंढ्या जखमी झाल्याची घटना घडली आहेत. 

नंदुरबार ते नवापूर मार्गावर आज (Nandurbar) सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. दरम्यान खामगाव शिवारात मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेली राज्य परिवहन महामंडळाची बस चालकाने ब्रेक न मारता थेट मेंढ्यांमध्ये घुसवली. यात मेंढ्या चिरडल्या गेल्या असून या (Accident) अपघातात १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर काही मेंढ्या जखमी झाल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान अपघात घडताच एसटी बस चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यावेळी मेंढपाळांनी दुचाकीवर जात एसटी बसचा पाठलाग केला. मात्र बसचालकाने बस भरधाव वेगाने नेल्याने ते मिळून आले नाही. दरम्यान याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT