Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: झोपेच्‍या डुलकीत घाटात अपघात; ट्रक चालकाचा जागीच मृत्‍यू, एक जखमी

झोपेच्‍या डुलकीत घाटात अपघात; ट्रक चालकाचा जागीच मृत्‍यू, एक जखमी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापुर (Navapur) येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरिल कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर गावाच्या शिवारात पहाटे चार वाजेच्या दरम्यान अपघात झाला. पहाटे ट्रक चालकाचा झोपेची डुलकी आल्‍याने अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्‍यू झाला. (Breaking Marathi News)

औरंगाबादहुन अद्रक भरून गुजरात राज्यातील सुरत येथे जाणारा आयसर टेम्पोवरिल चालक कोंडाईबारी घाट येथून भरघाव वेगात जात होता. दरम्‍यान खांबचौदर गावाच्या (Nandurbar News) शिवारात झोपेची गुंगी आल्‍याने चालकाने समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत टेम्पोची कँबीन चक्काचूर होवून चालक शेख रियाकत शेख हबीब (रा.खुलताबाद जि.ओरंगाबाद) हा जागीच ठार झाला. तर सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली.

क्रेनच्‍या सहाय्याने काढले दोघांना बाहेर

यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीसांना माहीती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने मयत चालक आणि जखमी सहचालकाला बाहेर काढले. सहचालक जबर जखमी असल्याने त्यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT