Nandurabar News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurabar News : नंदुरबारमध्ये रुग्णाच्या उपचारादरम्यान नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

Nandurabar News : तळोदा येथील मंगलश्याम हॉस्पिटलमध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण डॉ. योगेश्वर चौधरी यांच्या तात्काळ CPR मुळे वाचले.

Alisha Khedekar

  • तळोदा येथील मंगलश्याम हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला.

  • डॉ. योगेश्वर चौधरी यांनी तात्काळ CPR करून रुग्णाचे प्राण वाचवले.

  • घटना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडल्याने कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला.

  • संपूर्ण प्रसंग हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

नंदुरबारमधील तळोदा येथील मंगलश्याम हॉस्पिटलमध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेली एक हृदयस्पर्शी घटना सध्या स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. विषप्राशन केलेल्या एका युवकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते आणि त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्याचे नातेवाईक बाहेरील ओपीडीमध्ये चिंतेत बसले होते. अशातच त्याच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीची अचानक तब्येत बिघडली.

सुरुवातीला त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच त्याची मान खाली पडली. या अनपेक्षित प्रसंगाने त्याच्यासोबत असलेल्या मुलीला मोठा धक्का बसला आणि ती घाबरून रडू लागली. ही गंभीर स्थिती पाहताच हृदयरोग तज्ज्ञ डॉ. योगेश्वर चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने धाव घेतली. त्यांनी रुग्णाला ‘हेड लो पोझिशन’ मध्ये ठेवून त्वरित तपासणी केली. तपासणीत आढळले की त्या व्यक्तीचे हृदय थांबले असून त्याचे ठोके पूर्णपणे बंद झाले होते. परिस्थितीची गंभीरता ओळखून डॉ. चौधरी यांनी तात्काळ सीपीआर आणि आवश्यक वैद्यकीय पद्धतींचा वापर सुरू केला. काही मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर रुग्णाचे हृदय पुन्हा धडकू लागले आणि शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत झाला.

डॉ. चौधरी यांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे काही क्षणांतच रुग्णाला शुद्धी आली. त्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील आवश्यक उपचार देण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो हळूहळू पूर्ण बरा होत आहे. डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे आणि तात्काळ निर्णयक्षमतेमुळे एका कुटुंबावर ओढवलेले मोठे संकट टळले.

या घटनेनंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, रक्षाबंधनाच्या सणाच्या पूर्वसंध्येला पत्नीचे सौभाग्य आणि मुलीचे वडील वाचले, हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. संपूर्ण घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, डॉक्टरांच्या या तत्पर सेवाभावाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

BJP : १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच, विरोधानंतर सत्ताधारी भाजपचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT