Nanded Truck-van Accident 6 Killed, 8 Injured On Nanded-bhokar Highway saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

Major Accident In Nanded: नांदेड-भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ ट्रक आणि प्रवासी व्हॅनची भीषण धडक झाली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

Bharat Jadhav

  • नांदेड-भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ ट्रक आणि प्रवासी व्हॅनची भीषण धडक झाली.

  • या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

  • ८ जण गंभीर जखमी असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले

संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी

नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ ट्रक आणि एका प्रवासी व्हॅनचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ट्रक भोकरकडून नांदेडकडे जात होता. त्यावेळी प्रवासी कारशी ट्रकची धडक झाली. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात ट्रकचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकलाय. नांदेड - भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ सीताखंडी येथे संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

अपघात नेमका झाला कसा?

भोकरकडून नांदेडच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी व्हॅनला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, टाटा व्हॅनचा चक्काचूर झाला. धडकेनंतर व्हॅन रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. अपघाताच्या वेळी दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. ही एक प्रवासी व्हॅन होती, त्यामुळे व्हॅनमध्ये एकूण 15 जण प्रवास करते होते.

ट्रकची व्हॅनला जोरदार धडक बसली. यात व्हॅनमधील ६ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आलीय. जखमी नागरिकांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलण्यात आलंय. एकूण ८ जण जखमी झाले आहे. पण, काही प्रवाशांची प्रकृती ही चिंताजनक आहे, त्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ट्रकचालक अडकला केबिनमध्ये

व्हॅनला धडक दिल्यामुळे ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, त्यामुळे अपघातानंतर ट्रकचालक केबिनमध्ये अडकून पडलाय. ट्रक चालकाला बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला, याचे कारण अद्याप कळाले नाहीये. व्हॅनमधून प्रवास करणारे हे स्थानिक रहिवाशीच आहे. त्यामुळे परिसरात मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश काळजी पिळवटून टाकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT