Nanded Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime: नांदेडमध्ये बदलापूर कांड! १० वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शाळेतील सेवकानेच केलं कृत्य

Nanded school incident:बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक छळानंतर नांदेडमध्येही विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा संतापजनक प्रकार घडला आहे.

Bhagyashree Kamble

अत्याचाराच्या घटनांमुळे राज्य हादरलं आहे. बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक छळानंतर नांदेडमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. शाळेतील एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला आहे.

नांदेड शहरातील ग्यानमाता विद्या विहार या शाळेतील ५२ वर्षीय सेवकानेच १० वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतीलच एका सेवकाने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. ही संतापजनक घटना नांदेड शहरातील ग्यानमाता विद्या विहार या शाळेत घडली आहे. पालकांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

साबसिंग मुन्नालाल मच्छल असे आरोपीचे नाव आहे. १० वर्षीय विद्यार्थी स्टोअर रूमकडे सामान ठेवण्यासाठी गेला होता. यादरम्यान नराधम त्या ठिकाणी आला. नंतर त्यानं मुलावर जबरदस्ती केली. त्यानं स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, सेवकानं मुलावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर मुलाने थेट घर गाठत याची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. संतप्त झालेल्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT